📄 माहितीचा अधिकार अधिनियम
(Right to Information Act), २००५
माहितीचा अधिकार (RTI) कायदा २००५ हा भारतीय संसदेचा एक महत्त्वाचा कायदा आहे जो नागरिकांना शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय माहिती मिळवण्याचा हक्क प्रदान करतो.
यामुळे नागरिक कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे माहिती मागू शकतात आणि ती ठराविक कालावधीत (३० दिवस) मिळणे अनिवार्य आहे .
हा कायदा १२ ऑक्टोबर २००५ पासून संपूर्ण भारतात लागू झाला .
⚖️ RTI कायद्याच्या मुख्य तरतुदी
कलम ३🔍 कलम ३
सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा मूलभूत अधिकार आहे.
⏱️ कलम ७
माहिती ३० दिवसांत देणे बंधनकारक (जीवित-मृत्यूशी संबंधित असल्यास ४८ तास).
💰 कलम ६ व ७
अर्ज शुल्क ₹ १०/-. अतिरिक्त माहितीसाठी प्रतिपृष्ठ ₹ २/-. बीपीएल धारकांसाठी विनाशुल्क .
⚖️ कलम १९
माहिती नाकारल्यास/अपूर्ण माहिती दिल्यास प्रथम व द्वितीय अपीलची तरतूद.
👥 ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी
कलम ५(१)📝 RTI अर्ज प्रक्रिया
कलम ६✍️ ऑफलाइन पद्धत
🌐 ऑनलाइन पद्धत
🔒 माहिती नाकारता येणारे विषय
कलम ८⏳ कालावधी व दंड
कलम ७ व २०| प्रकार | कालावधी | निकाल न मिळाल्यास / उशीर झाल्यास |
|---|---|---|
| सामान्य अर्ज | ३० दिवस | अर्ज निकाली न काढल्यास दंड ₹ २५० प्रतिदिन (कमाल ₹ २५,०००) |
| जीवित / स्वातंत्र्याशी संबंधित अर्ज | ४८ तास | शिस्तभंगाची कारवाई |
| तृतीय पक्षाचा समावेश | ४० दिवस | कारणे न दिल्यास दंड |
⚖️ अपील प्रक्रिया
कलम १९प्रथम अपील
जर माहिती नाकारली गेली किंवा अपूर्ण दिली गेली, तर ३० दिवसांत प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडे धावा करावी .
द्वितीय अपील
प्रथम अपीलाचा निकाल समाधानकारक नसल्यास ९० दिवसांत राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करावे .
🏛️ महाराष्ट्र राज्य माहिती आयोग
📞 मदत व संपर्क
ग्रामपंचायत कार्ला📌 टीप: माहितीचा अधिकार कायदा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. कोणत्याही नागरिकाला माहितीसाठी अर्ज करताना कारणे सांगण्याची आवश्यकता नाही.
